शिक्षण संचालनालय दादर आणि नगर हवेली , दिव दमन अंतर्गत कार्यशिक्षण शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , लेखापाल इ.पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate of Education Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 23 ) पदनाम पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्य शिक्षण शिक्षक पदांच्या 01 जागा , ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 01 जागा , लेखापाल पदांच्या 01 जागा , ब्लॉक संसाधन व्यक्ती पदांच्या 05 जागा , ब्लॉक एमआयएस समन्वय पदांच्या 01 जागा , डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 01 जागा , विशेष शिक्षक पदांच्या 08 जागा अशा एकुण 23 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : तंत्रशिक्षण संचालनालय मध्ये संचालक , लिपिक , लघुलेखक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पदांनुसार आवश्यक पात्रता / वेतनश्रेणी :
| पदनाम | पात्रता | वेतनश्रेणी |
| कार्य शिक्षण शिक्षक | डिप्लोमा / पदवी | 13,000/- |
| ग्रंथपाल | ग्रंथपाल पदवी | 14,000/- |
| प्रयोगशाळा सहाय्यक | बी.एस्सी | 15,000/- |
| लेखापाल | बी.कॉम | 18,000/- |
| ब्लॉक संसाधन व्यक्ती | BA/B.SC/B.COM | 31,400/- |
| ब्लॉक एमआयएस समन्वयक | BBA/BCA/BE अथवा B.SC | 21,775/- |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर | पदवी | 18,000/- |
| विशेष शिक्षक | बी.एड | 27,000/- |
आवेदन प्रक्रिया : यांमध्ये लेखापाल , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , कार्य शिक्षण शिक्षक या पदांकरीता दमण शिक्षा सदन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मागे मोति दमण , दमण – 3962220 या पत्यावर आवेदन दिनांक 20.09.2023पर्यंत सादर करायचे आहेत .
तर इतर उर्वरित सर्व पदांकरीता शिक्षण विभाग कार्यालय , तिसरा माळा खोली क्र.312 लेख भवन – 66 केव्ही रोड आमली – सिलवासा – 3 या पत्यावर आवेदन दि.21.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .