HAL : हिंदुस्थान एरोनॉटिक्स नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

हिंदुस्थान एरोनॉटिक्स नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Hindustan Aeronautics Ltd. Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 58 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ऑपरेटर ( बांधकाम )02
02.ऑपरेटर ( इलेक्ट्रिकल)14
03.ऑपरेटर ( इलेक्ट्रॉनिक्स )06
04.ऑपरेटर ( मेकॅनिकल )06
05.ऑपरेटर ( फिटर )26
06.ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)04
 एकुण पदांची संख्या58

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 ते 04 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड / विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : शिक्षक , रेक्टर , आचारी , चौकीदार , शिपाई , चालक , महिला कर्मचारी इ. पदांसाठी भरती ..

पद क्र.05  व 06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच 60 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 मे 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://optnsk.reg.org.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment