आयडीबीआय बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 2100 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत मुदतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Industrial Development Bank Of India Recruitment For Junior Assistant Manager & Executive – Sales & Operation Post , Number of post Vacancy – 2100 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) पदांच्या 800 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता गुणांमध्ये 05 टक्यांची सुट देण्यात येईल .
02.एक्झिक्युटिव सेल्स & ऑपरेशन ( ESO ) : एक्झिक्युटिव सेल्स & ऑपरेशन ( ESO) पदांच्या 1300 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : वरील पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.11.2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/idbiesonov23/ या संकेतस्थळावर दिनांक 06 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता ओपन / इतर मागास प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !