Mahatransco : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये तब्बल 2,541 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये तब्बल 2,541 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmision Company Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2,541 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये विद्युत सहाय्यक ( पारेषण ) पदांच्या 1903 जागा , वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या 124 जागा , तंत्रज्ञ -01 पदांच्या 200 जागा तर तंत्रज्ञ – 02 पदांच्या 314 जागा अशा एकुण 2,541 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विद्युत सहाय्यक (पारेषण )1903
02.वरिष्ठ तंत्रज्ञ124
03.तंत्रज्ञ – 01200
04.तंत्रज्ञ -02314
 एकुण पदांची संख्या2541

हे पण वाचा : लिपिक पदांच्या 8,000+ जागेसाठी महाभरती 2023

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग / आर्थिक द्ष्ट्या दुर्बल / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्हता / पात्रता  : सदर पदांकरीता उमेदवार हे शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असणार आहेत किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले विजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असणार आहेत .

वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस 15,000-88,190/- या वेतनश्रेणीमध्ये वेतनमान अदा करण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mahatransco.in/career/active  या संकेतस्थळावर दिनांक 10 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ प्रवर्गातील उमदेवारांकरीता 250/- रुपये परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment