भारतीय टपाल खात्यामध्ये डाकसेवक , शाखा पोस्टमास्टर , मेलगार्ड इत्यादी पदांच्या एकुण 26000+ जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( India Post Department Recruitment for mailgaurd , daksevak,post master,Assistant post master ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
देशातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे .पोस्टामध्ये तब्बल 26000+ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात असल्याने , देशातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत डाक विभागाकडुन नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून , या 26000+ रिक्त जागांवर लवकरच मेगाभरती राबविण्यात येणार आहे . यामध्ये ग्रामीण भागामध्ये कार्यरत पोस्ट ऑफीस साठी ग्रामीण डाकसेवक , शाखा पोस्टमास्टर , सहाय्यक पोस्टमास्टर त्याच बरोबर मेलगार्ड या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .
पात्रता /वयोमर्यादा – ग्रामीण डाकसेवक , शाखा पोस्टमास्टर , सहाय्यक पोस्टमास्तर तसेच मेलगार्ड या पदांकरीता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर MSCIT / CCC किंवा संगणक हाताळणी समकक्ष कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 43 वर्षे असणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया – ग्रामीण डाकसेवक पदांकरीता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही . केवळ 10 वि ( SSC ) गुणांच्या आधारावर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
अधिकृत्त नोटीफिकेशन पाहा – अधिकृत संकेतस्थळ
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !