राज्य शासन सेवेत वाहनचालक पदांचे सुमारे 1060 जागा रिक्त आहेत . सदर वाहनचालक पदांकरीता बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून , वाहनचालक पदांकरीता आवश्यक पात्रता , मानधन यामध्ये नमुद करण्यात आले आहेत .या संदर्भातील सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासनाच्या भरती नियम धोरणानुसार राज्य शासन सेवेत वाहनचालक हे पद सरळसेवा पद्धतीने कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यापासून वगळण्यात आले आहेत .यामुळे वाहनचालक हे पद आता बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत . बाह्य यंत्रणेद्वारे वाहनचालक पदाकरीता मासिक 21,500/- ठोक मानधन अदा करण्यात येतील . याकरीता कामाचे 9 तास असणार आहेत .दररोजच्या 9 तासापेक्षा जास्त काम झाल्यास शासनाच्या प्रचलित दराने अतिकालिक भत्ता 40/- रुपये अदा करण्यात येईल . त्याचबरोबर कामाच्या हद्दीच्या बाहेर जावे लागल्यास 300/- रुपये भत्ता अनुज्ञेय करण्यात येईल .
त्याचबरोबर रात्री 10.00 वा नंतर वाहनचालकास थांबावे लागल्यास जेवण भत्ता म्हणुन 150/- रुपये अदा करण्यात येणार आहे. शिवाय रात्री घरी जाण्याचा प्रवास भत्त्याचा दर हा 200/- रुपये असणार आहे .या मानधन पद्धतीवर सध्या राज्य शासनाकडुन वाहनचालक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
लवकरच राज्य शासन सेवेत वाहनचालक पदांच्या सुमारे 1060 पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील वाहनचालक हे पद आता बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात येईल .
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !