भारतीय डाक विभागांमध्ये तब्बल 30,041 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , इयत्ता 10 वी पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( India Post Office Department Recruitmen For GDS , Number of Post Vacacny – 30041 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये ग्रामीण डाक पोस्टमास्टर ( BPM ) , सहाय्यक शाखा पोस्टमास्टर ( GDS – ABPM ) पदांच्या तब्बल 30041 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर मुलभूत संगणक प्रशिक्षण ( MSCIT / CCC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदरची पदे ही देशातील सर्व घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील रिक्त पदे आहेत .
वयोमर्यादा – सदर ग्रामीण डाकसेवक या पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी किमान 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर मागास वर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://majhinaukri.in/india-post-recruitment/ या संकेतस्थळावर दिनांक 23 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी जनरल / इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर SC/ST/PWD /महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..