महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक , अधिक्षिका , स्वयंपाकी , कामाठी , मदतनिस पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत चालविलेल्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेत रिक्त पद कर्मचारी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांस विहीत करण्यात आलेली अर्हताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

1.प्राथमिक शिक्षक ( शिक्षण सेवक )  : पदांच्या 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी , डी.एड व TET / CTET उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे सदर पदे हे अनुसुचित प्रवर्ग करीता आरक्षित करण्यात आले आहेत .

2.माध्यमिक शिक्षक ( शिक्षण सेवक ) : सदर पदांच्या 02 जागा अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता आरक्षित करण्यात येत असून , सदर पदांस बी.एस्सी , बी.एड ( गणित ) , बी.बी.एड 1 ( जनरल ) ( TET / CTET ) उत्तीर्ण असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल .

3.उच्च माध्यमिक शिक्षक ( शिक्षण सेवक ) :  सदर पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदास एम.ए बी.एड ( भुगोल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये TET / CTET प्रमाणपत्र उत्तीर्ण उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल .

हे पण वाचा : अधिकारी संवर्गातील ( गट अ / श्रेणी अ ) पदांच्या 1402 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

4.स्त्री अधिक्षिका : स्त्री अधिक्षिका पदांच्या 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांस उमेदवार हे बीएसडब्लु / एमएसडब्लु अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

5.स्वयंपाकी :  स्वयंपाकी पदांच्या एकुण 05 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर  पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

6.कामाठी : कामाठी पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 7 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

7.मदतनिस : मदतनिस पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 07 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : वरील पैकी पद क्र.01 ते 04 पर्यंतच्या पदांसाठी आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक 20.08.2023 तर पद क्र.05 ते 07 करीता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 10.08.2023 अशी असणार आहे . आवेदन सादर करण्याचा पत्ता – आदिवासी उन्नतमी सेवा मंडळ राजूर ता अकोले जि. अहमदनगर या पत्त्यावर सादर करायचे आहेत .

 अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment