अधिकारी संवर्गातील ( गट अ / श्रेणी अ ) पदांच्या 1402 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

IBPS मार्फत अधिकारी स्केल – 1 पदांच्या तब्बल 1402 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Institute of Banking Personnel Selection Recruitment For Officers Scale – 1 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

1.आयटी अधिकारी स्केल -1 : आयटी अधिकारी स्केल – 1 पदांच्या 120 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे कॉम्पुटर विज्ञान / संगणक ॲप्लिकेशन / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्टुमेंटेशन मध्ये बी.ई / बी.टेक अथवा पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

2.ॲग्रीकल्चरल फिल्ड अधिकारी ( स्केल -1 ) : सदर पदांच्या एकुण 500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता कृषी / पशुवैद्यकी विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / पशुपालन /कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / अन्न तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी / शेती व्यवसाय पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

3.राजभाषा अधिकारी स्केल -1 : राजभाषा अधिकारी स्केल – 1 पदांच्या एकुण 41 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ..

हे पण वाचा : महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक , अधिक्षिका , स्वयंपाकी , कामाठी , मदतनिस पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

4.विधी अधिकारी ( स्केल -1 ) : विधी अधिकारी स्केल -1 पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे LLB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

5.HR /पर्सोनेल अधिकारी स्केल 1 :  एचआर / पर्सोनेल अधिकारी स्केल -1 पदांच्या एकुण 31 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर , पर्सनल मॅनेजमेंट / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा / सामाजिक कार्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

6.मार्केटिंग अधिकारी स्केल 1 :  मार्केटिंग अधिकारी स्केल – 1  पदांच्या 700 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवीधर , MMS /MBA / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तर अनुसुचित जाती / जमाती प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/ या संकेतस्थळावर दिनांक 28 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदांसाठी आवेदन करण्यासाठी जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 850/- परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्गाकरीता 175/- परीक्षा / आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment