अधिकारी , लिपिक , परिचर , सफाईवाला इ. पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अहमदनगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Ex-Servicema Contributory Health Scheme ahamadanagar Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 29 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय विशेषज्ञ02
02.वैद्यकीय अधिकारी03
03.दंत अधिकारी02
04.प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
05.प्रयोगशाळा सहाय्यक02
06.फार्मासिस्ट05
07.दंत स्वच्छता / सहायक04
08.लिपिक01
09.महिला परिचर04
10.सफाईवाला03
 एकुण पदसंख्या29

पात्रता – वैद्यकीय विशेषज्ञ / वैद्यकीय अधिकारी / दंत अधिकारी पदांकरीता उमेदवार हे एमडी /एमएस/डीएनबी /एमबीबीएस / बीडीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक या पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( मेडिकल लॅब टेक ) / DMLT ( सशस्त्र दल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक , अधिक्षिका , स्वयंपाकी , कामाठी , मदतनिस पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

फार्मासिस्ट या पदाकरीता उमेदवार हे बी फार्मसी तर दंत स्वच्छता / सहायक पदाकरीता दंत स्वच्छता डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तर लिपिक या पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर महिला परिचर व सफाईवाला या पदांकरीता उमेदवार हे साक्षर असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC Station HQS ( ECHS Cell )  अहमदनगर या पत्त्यावर दिनांक 21 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , सदर वरील सर्व पदांकरीता कोणत्याही प्रकारचे परीक्षा / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment