भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Institute of Information Technology , Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 54 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक प्राध्यापक | 39 |
| 02. | सहायक निबंधक | 02 |
| 03. | कनिष्ठ अधिक्षक | 04 |
| 04. | शारीरिक प्रशिक्ष्ण सह योग प्रशिक्षक | 01 |
| 05. | कनिष्ठ तंत्रज्ञ | 03 |
| 06. | कनिष्ठ सहाय्यक | 05 |
| एकुण पदांची संख्या | 54 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी सह पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 55 टक्के गुणांसह पदवी अथवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : यूआर राव उपग्रह केंद्र मध्ये विविध पदांच्या 224 जागेसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : संबंधित क्षेत्रामधील 06 वर्षांच्या अनुभवासह प्रथम श्रेणी बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.04 साठी : पदवीधर शारीरिक शिक्षण अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : संगणक ऑपरेशन्सच्या ज्ञानासह बॅचलर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे संचालक इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी , ( आयआयटी ) पुणे सर्व्हे नं9/12/2 आंबेगाव बुद्रुक सिंहगड इन्स्टिट्युट रोड पुणे – 4111041 , महाराष्ट्र या पत्यावर दिनांक 18 मार्च 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !