सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे गट क संवर्गातील सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती !

Spread the love

सैनिक कल्याण विभाग , महराष्ट्र राज्य पुणे येथे सरळसेवा पद्धतीने गट क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Sainik Kalyan Vibhan , Maharashtra State Recruitment For Various Class C Post , Number of Post Vacancy – 62 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कल्याण संघटक40
02.वसतिगृह अधिक्षक17
03.कवायत प्रशिक्षक01
04.शारिरिक प्रशिक्षण निदेशक01
05.वसतिगृह अधिक्षिका03
 एकुण पदांची संख्या62

वेतनश्रेणी ( Pay Scale ) : वरील सर्व पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार ( 7th Pay Commission )  एस – 8 मध्ये 25,500-81,100/- या वेतनश्रेणीत वेतन आहरित करण्यात येईल .

हे पण वाचा : भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र मध्ये विविध पदांकरीता पदभरती , Apply Now !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..

आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / आर्थिक दुर्बल घटक करीता 900/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया ( Application Process )  : जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पासुन ते दिनांक 03 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment