India Post : अखेर भारतीय टपाल विभागात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या 40,889 जागेसाठी जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

Spread the love

भारतीय टपाल विभागामध्ये इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी 40,889 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारकांसाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .सदर डाकसेवक पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसुन केवळ इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .( Indian Post Department Recruitment for GDS Post , Number of Post vacancy – 40,889 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – ग्रामीण डाकसेवक , शाखा पोस्टमास्टर , सहाय्यक शाखा पोस्टमास्टर , मेलगार्ड

पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळाकडुन इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवार हा MSCIT /CCC  संगणक हाताळणी प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष् पुर्ण होणे आवश्यक आहे .तसेच राज्यनिहाय राज्यभाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .जसे कि , महाराष्ट्र राज्यात मराठी तर गोवा मध्ये मराठी / कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

पदांची संख्या – भारतीय डाक विभागांमध्ये एकुण 40,889 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्या येत असून , महाराष्ट्र सर्कल मध्ये 2414 तर गोवा सर्कल मध्ये 94 रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

निवड प्रक्रिया – सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नसून केवळ 10 वी गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल .इयत्ता 10 वीमध्ये गुणवत्तेच्या आधारे निवड यादी लावण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.16.02.2023 पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागसवर्गीय व महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment