महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये गट – क संवर्गातील 4,075 जागेवर मेगाभर्ती प्रक्रिया जाहीर ! अखेर पदभरती GR निर्गमित !

Spread the love

महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागांमध्ये 8000+ पदे रिक्त आहेत . यापैकी वर्ग क संवर्गा मध्ये 4075 जागा रिक्त आहेत .सदर रिक्त पदांवर पदभरती राबविण्याकरीता जलसंपदा विभागाकडुन दि.27 जानेवारी 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या पदभरती संदर्भातील जलसंपदा विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहुयात …

राज्यातील प्रोदशिक स्तरावर वेगवेगळी भरती प्रक्रिया न राबविता जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयांतील गट – क संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे .जलसंपदा विभाग अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील गट – क संवर्गातील नामनिर्देशनाची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेसाठी शासनाकडुन नेमण्यात आलेल्या एजन्सीसोबत या समन्वय समितीकडून सामंजस्य करार करण्यात येणार आहे .

यापैकी लिपिक टंकलेखन पदांची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार असून , उर्वरित पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत .

परिक्षार्थींकडून परिमंडळनिहाय व पदनिहाय याप्रमाणे विकल्प घेण्यात येणार आहेत .तसेच समन्वय निवड समितीकडुन परीक्षा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर , निवड झालेल्या परीक्षार्थींना गुणवत्तेनुसार त्यांनी दिलेल्या विकल्पानुसार परिमंडळांतर्गत वाटप करण्यात येणार आहे .त्यानंतर परिमंडळ मंडळाकडून पदनियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे .

या समन्वय समितीकडुन भरती प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भविल्यास , संबंधित प्रादेशिक निवड समितीकडून अशी न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यात येणार आहेत . सदर पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment