विद्यार्थ्यााच्या शाळाप्रवेशाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.27 जानेवारी 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील GR पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शैक्षणिक प्रवेशांमध्ये होणाऱ्या कथित गैरप्रकारांना भविष्यात आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम पाहणार आहे .सदर समिती प्रवेश प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवील .
विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरुन घेतले जाणार आहेत .तसेच विद्यार्थ्यांस प्रेवश देताना आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे , त्यासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड जोडावे लागणार आहेत .सदर कागपतत्रांची पडताळणी शिक्षण निरीक्षक / गट शिक्षणाधिकारी / केंद्रप्रमुख यांच्या कडुन करण्यात येणार आहेत .
जर सदर निर्णयातील नियमांमध्ये अनियमितता आढळून आल्यास सदर शैक्षणिक संस्थांचे अनुदान परत घेण्यात येईल , तसेच शाळेची मान्यता काढून घेण्यात येईल . या संदर्भाती शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला शाळाप्रवेशाबाबत महत्वपुर्ण मार्गदर्शक सूचना बाबतचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !
- MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 13 रिक्त जागेसाठी पदभरती !
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !