Tax Assistant : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कर सहाय्यक पदांच्या 468 जागांसाठी पदभरती ! कमी स्पर्धकामुळे मोठी संधी !

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कर सहाय्यक पदांच्या एकुण 468 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी स्पर्धक खुपच कमी असतात , यामुळे योग्य अभ्यासक्रमानुसार अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळेल .सदर पदांसाठी आवश्यक पात्रता , परिक्षा अभ्यासक्रम , वेतनश्रेणी याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

कर सहाय्यक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवाीर हा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवार हा MSCIT /CCC किंवा संगणक हाताळणी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच दि.01 मे 2023 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सर्वच वर्ग  क संवर्गातील पदांकरीता सामायिक पूर्व परीक्षा दि.30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणार असून पुर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 09 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येईल .कर सहाय्यक मुख्य परीक्षेकरीता अभ्यासक्रम कोणता असतो ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

कर सहाय्यक मुख्य परीक्षेकरीता नागरकिशास्त्र , भारतीय राज्यघटना , पंचवार्षिक योजना , चालु घडामोडी , बुद्धीमत्ता चाचणी , पुस्तपालन व लेखाकर्म , अंकगणित , आर्थिक सुधारणा व कायदे या विषयांवर प्रश्न विचारले जातात .यामध्ये पुस्तपालन व लेखाकर्म हा विषय अधिक महत्वाचे असून यावर आधारीत अधिक प्रश्न विचारले जातात .

मुख्य परिक्षेमध्ये पुस्तपालन व लेखाकर्म हा विषय असल्याने , या पदासाठी लिपिक टंकलेखक पदांच्या तुलनेत खुपच कमी स्पर्धक असतात .यामुळे उमेदवारांना कर सहाय्यक पदावर यश मिळविण्याची ही मोठी संधी आहे .

MPSC वर्ग – क पदांच्या पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

अभ्यासक्रम PDF

Leave a Comment