भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 9,000 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 9000 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railway Corporation Recruitment For Technician Post , Number of Post Vacancy – 9000 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये टेक्निशियन पदांच्या एकुण 9000 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Corporation Recruitment For Technician Post , Number of Post Vacancy – 9000 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( NCVT / SCVT ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : ग्रामीण विद्युतीकरण कार्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 127 जागेसाठी मोठी पदभरती !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024  रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05  तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbmumbai.gov.in/Technician_2024.php या संकेतस्थळावर सादर करण्याची सुरुवात व शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .सदर पदभरती प्र्क्रिया करीता खुला / इतर मागास प्रवर्ग / आ.दु.घ प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक करीता 250/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment