डाटा एन्ट्री ऑपरेटर , शिपाई ( MTS ) पदांसाठी BECIL इंडिया मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

BECIL इंडिया लिमिटेड मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई ( MTS ) पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BECIL Recruitment For Data Entry Operators & MTS Post , Number of Post Vacancy – 18 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.डाटा एन्ट्री ऑपरेटर ( Data Entry Operators ) : सदर पदांच्या एकुण 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेरदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवारास संगणक , MS Exel तसेच टायपिंग इंग्रजी 35 प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , सदर पदांस प्रतिमहा 23,082/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .

हे पण वाचा : पुणे येथे लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , शिपाई , आयटीआय पदे इ. पदांवर सरकारी नोकरीची पर्मनंट संधी !

02.शिपाई ( MTS ) : सदर पदांच्या 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्क असणार आहेत , तसेच उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता प्रतिमहा 17,494/- रुपये वेतनमान अदा करण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.becil.com/ या संकेतस्थळावर दिनांक 07.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 885/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / माजी सैनिक प्रवर्ग करीता 531/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment