भारतीय रेल्वे मध्ये सरळसेवा पद्धतीने ग्रेड I आणि ग्रेड III पदांच्या 9,144 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !      

Spread the love

भारतीय रेल्व मध्ये सरळसेवा पद्धतीने ग्रेड I आणि ग्रेड III पदांच्या 9,144 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Railways Department Recruitment For Technician Post , Number of Post Vacancy -9,144 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.टेक्निशियन ( Technician Grade -I Signal ) ग्रेड I सिग्नल : सदर पदांच्या एकुण 1092 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी / बी.टेक / डीप्लोमा इन फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / आयटी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 36 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

02. टेक्निशियन ( Technician Grade -III ) ग्रेड III : सदर पदांच्या एकुण 8,052 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण किंवा 12 वी विज्ञान शाखेतुन PCM विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

वेतनमान ( Pay Scale ) :

पदनामपे लेव्हल 7 th CPCBasic Pay
टेक्निशियन ग्रेड I सिग्नललेव्हल – 529,200
टेक्निशियन  ग्रेड IIIलेव्हल – 219,900

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing या संकेतस्थळावर दिनांक 08 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग , माजी सैनिक / महिला / आ.दु.घ प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment