जळगाव पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 86 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( बांधकाम ) | 10 |
02. | कनिष्ठ अभियंता ( पाणी पुरवठा ) | 03 |
03. | कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) | 04 |
04. | रचना सहायक | 04 |
05. | आरेखक | 02 |
06. | अग्निशमन फायरमन | 15 |
07. | विजतंत्री | 06 |
08. | आरोग्य निरीक्षक | 10 |
09. | वायरमन | 12 |
10. | टायपिस्ट / संगणक चालक | 20 |
एकुण पदांची संख्या | 86 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 ते 04 साठी : उमेदवार हे मराठी भाषेसह इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित क्षेत्रांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : आरेखक कोर्स तसेच NCVT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.06 साठी : इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच राष्ट्रीय अथवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मार्फत 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.07 व 09 साठी : शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विजतंत्री / तारतंत्री कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे NCVT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे .
पद क्र.08 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत सेच शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.10 साठी : इयत्ता 12 वी उत्तीर्ण आवश्यक तसेच मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक तसेच MSCIT अर्हता उत्तीर्ण आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आस्थापना विभाग प्रशासकीय इमारत दहावा मजला सरदार वल्लभभाई पटेल टॉवर , महात्मा गांधी रोड नेहरु चौक जळगाव – 425001 या पत्यावर दिनांक 20.10.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क ( Application Fees ) आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !