लेखा व कोषागार कोकण विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kokan Mahakosha vibhag recruitment for class c post , number of post vacancy – 179 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ लेखापाल ( गट – क ) पदांच्या एकुण 179 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 06.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : वित्त व कोषागारे अमरावती विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी पदभरती ;
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mahakosh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 04.02.2025 पासुन ते दिनांक 06.03.2025 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क तर माजी सैनिक करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026