राज्य शासन सेवेत तब्बल 1 लाख पदांसाठी पदभरती प्रक्रिया करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे .यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरीची संधी मिळणार आहे .सदर 1 लाख पदांपैकी पहिल्या टप्यातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे .यासाठी राज्यातील विविध विभागांकडुन रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे .
राज्य शासन सेवेत मंजुर पदांपैकी तब्बल अडीच लाख पदे रिक्त आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांचा कामाचा मोठा ताण येत आहे .परिणामी प्रशासकीय कामकाज लांबणीवर पडत असल्याने नागरिकांचे कामकाज वेळेत होत नसल्याने , मुख्यमंत्री महोदयांनी रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यास राज्यातील सर्व विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत .पहिल्या टप्यामध्ये 1 लाख पदांपैकी 70 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली .सदर भरती प्रक्रिया मंत्रीमंडळ विस्तारानंतर तात्काळ राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे .
यामुळे राज्यातील रिक्त पदांपैकी 50 टक्के जागांवर म्हणजेच 70 हजार जागांवर पदभरती प्रक्रिया आयोजित करण्यात येईल .यामध्ये वर्ग -3 व वर्ग 4 पदांसाठी सरळसेवा पद्धतीने परिक्षेचे आयोजन करण्यात येईल .तर काही पदे हे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत .
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !