महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र जिल्हा न्यायालयमध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra District Court Recruitment For Stenografer , Juniour Clerk , Peon / Hamal Post , Number of Post Vacancy – 5,793 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.लघुलेखक ( श्रेणी -3 ) :  लघुलेखक ( श्रेणी -3 )  पदांच्या 714 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी लघुलेखन 100 WPM व मराठी 80 श.प्र.मि तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 3,495 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : गट अ , ब , क आणि ड संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती !

03.शिपाई / हमाल : शिपाई / हमाल पदांच्या 1585 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता सातवी पास असणे आवश्यक असणार आहेत .

वयाची मर्यादा : यांमध्ये उमेदवाराची किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वय हे 43 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी दिनांक 04 डिसेंबर 2023 पासून https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php या संकेतस्थळावर दिनांक 18 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment