नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राज्यात नमो महारोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत . ( Namo Maha Employement Recruitment For 10,000+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name /Number of Post ) : यांमध्ये फिटर , टर्नर , मशिनिस्ट , पेंटर , कारपेंटर , वेल्डर , फिल्ड विक्री एक्झिक्युटिव्ह , विक्री सहाय्यक , ड्राफ्टसमन , इलेक्ट्रिशियन , इंजिनिअर , ट्रेनी , डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी / 12 वी तसेच आयटीआय / डी.फार्मा / एमबीए / डिप्लोमा धारक तसेच पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , गृहपाल , अधिक्षक , शिक्षक , ग्रंथपाल , प्र. सहाय्यक इ.पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

मेळाव्याचे ठिकाण दिनांक / वेळ : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी दिनांक 09 व 10 डिसेंबर 2023 रोजी जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत , नागपुर विद्यापीठ , अमरावती रोड नागपुर या पत्यावर सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अर्ज प्रक्रिया : सदर मेळाव्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करण्यासाठी https://jobfair.edu-ims.com/candidateregs-user या संकेतस्थळावर दिनांक 09 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावेत ..

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment