सामान्य प्रशासन विभागाच्या दि.17.12.2016 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी गट ब या संवर्गातील पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी ,पदसंख्या याबाबतची सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी गट ब राजपत्रित संवर्ग या पदांसाठी राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . शैक्षणिक व इतर जाहिराती मध्ये नमूद अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन ऑफलाईन / पोस्टाने सादर करायचे आहेत . यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी या संवर्गातील एकुण 189 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता – यामध्ये अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान अथवा कृषी शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र या विषायातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट पदवी किंवा वैद्यकशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : आदिवासी विकास विभाग मध्ये पदभरती प्रक्रिया !
कोणते कर्मचारी करु शकतील अर्ज – सदर पदांकरीता राज्य शासन सेवेत एस – 15 मध्ये 41,800/-132300/- या वेतनश्रेणींमध्ये कार्यरत असणारे व वरील नमुद शैक्षणिक अर्हताधारक कर्मचारी सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन करु शकतील .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभाग 9 वा मजला , नविन मंत्रालय जी.टी हॉस्पीटल कॉम्प्लेक्स संकुल लोकमान्य टिळक मार्ग , मुंबई 400002 या पत्त्यावर दि.12 मे 2023 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करावे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !