पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध विभागांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये आवेदन मागवण्यात येत आहे .
1) कार्यालय सहाय्यक : कार्यालय सहाय्यक पदाकरिता उमेदवार हा पदवीधारक असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . वित्त व लेखा विभाग मधील पदांसाठी उमेदवार हा वाणिज्य पदवीधारक असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर टॅली , एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .
2) प्रयोगशाळा सहाय्यक : प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरिता उमेदवार हा B.SC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर सदर पदावर उमेदवार हा एक ते दोन वर्ष संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 4000+ जागांसाठी मेगाभर्ती ! Apply Now !
3) ग्रंथालय सहाय्यक : ग्रंथालय सहाय्यक पदाकरिता उमेदवार हा B.lib / M.Lib उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर महाविद्यालयातील ग्रंथालय कामकाजाचा अनुभव असणाऱ्या उमेदवार प्राधान्य देण्यात येणार आहे .
4) कनिष्ठ परिवेक्षक: कनिष्ठ पर्यवेक्षक पदाकरिता उमेदवार हा स्थापत्य पदविका धारक असणे आवश्यक आहे , महाविद्यालयातील स्थावर विभागातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे .
5) चतुर्थ श्रेणी कर्मचारी : चतुर्थ श्रेणी कर्मचारी यामध्ये प्रयोगशाळा परिचर , ग्रंथालय परिचर ,शिपाई या पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता नववी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमध्ये कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार येईल .
6) प्रशासकीय अधिकारी : प्रशासकीय अधिकारी पदाकरिता उमेदवार हा पदवी / पदव्युत्तर पदवी , एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता मराठी / इंग्रजी टायपिंग पात्रता असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
7) डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह : सदर पदाकरिता उमेदवार हा डिजिटल मार्केटिंग मध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज प्रथम https://forms.office.com/Apply या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्राथमिक माहिती भरायची आहे . त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्यवर्ती कार्यालय फर्ग्युसन महाविद्यालय परिसर पुणे 411004 या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे .सदर पद भरती प्रक्रिया करिता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे ,तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !