केंद्र सरकारच्या भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 4 हजार 374 पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . आवश्यक पात्रता , अर्हता या बाबत पदनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
तांत्रिक अधिकारी वर्ग क – तांत्रिक अधिकारी वर्ग क पदांच्या एकुण 181 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा 60 टक्के गुणांसह M.SC / 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक उत्तीर्ण असणे आवश्यक अथवा 55 टक्के गुणांसह एम.लिब +अनुभव असणे आवश्यक आहे .सदर पदांसाठी अर्ज सादर करण्याकरीता उमेदवाराचे वय दि.22 मे 2023 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
सायंटिफिक सहाय्यक -सायंटिफिक सहाय्यक पदांच्या एकुण 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 60 गुणांसह B.SC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.22 मे .2023 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : मुंबई पालिका मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
टेक्निशियन – टेक्निशियन पदांच्या एकुण 24 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.22 मे .2023 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी I ) – स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी I ) पदांच्या एकुण 1216 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा 60 टक्के गुणांसह B.SC किंवा 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अथवा 50 टक्के गुणांसह B.SC + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.22 मे .2023 रोजी 18 वर्षे ते 24 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : शिक्षक ,चौकीदार ,शिपाई ,चालक पदांसाठी मोठी भरती !
स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी II ) – स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी II ) पदांच्या एकुण 2946 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 60 टक्के गुणांसह 10 वी + आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.22 मे .2023 रोजी 18 वर्षे ते 22 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादेमध्ये सुट : वरील सर्व पदांकरीता दि.22.05.2023 रोजी मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात यईल तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : वरील प्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://barconlineexam.com/ या संकेतस्थळावर दि.24 एप्रिल 2023 पासुन ते 22 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !