भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 4,374 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदनाम , शैक्षणिक अर्हता , पदसंख्या याबाबत सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात .
भाभा संशोधन केंद्र मुंबई हे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असून , यांमध्ये रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Bhabha Atomic Research Centre , Mumbai Recruitment for Various Post , Number of Post 4,374 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये वर्ग क तांत्रिक अधिकारी पदांच्या 181 जागा , सायंटिफिक सहाय्यक पदांच्या 07 जागा , टेक्निशियन पदांच्या 24 जागा स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी I ) पदांच्या एकुण 1216 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत तर स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी II ) पदांच्या एकुण 2946 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . असे एकुण 4 हजार 374 पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://barconlineexam.com/ या संकेतस्थळावर दि 22.05.2023 पर्यंत रात्री 11.59 पर्यंत सादर करायचा आहे , अर्ज सादर करण्याची सुरुवात दि.24.04.2023 आहे . अर्ज सादर करताना योग्य माहिती भरणे आवश्यक असणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !