भरती : शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , वाहनचालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

शाहु शिक्षण संस्था पंढरपुर संचलित संस्थामध्ये शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई व वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

प्राथमिक शिक्षक पदांच्या एकुण 08 जागासांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर प्राथमिक शिक्षक पदांकरीता उमेदवार हा बी.ए डी.टी.एड , बी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच टी.ई.टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संबंधित अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे .

माध्यमिक शिक्षक पदांच्या एकुण 09 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा बी.ए बी.एड ( इंग्रजी , इतिहास , भूगोल , हिंदी , मराठी ) बी.ए.एम.ए बी.एड , B.SC , M.SC , B.ED पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच शिकविण्याचा अनुभव आवश्कय आहे .

हे पण वाचा : 10 वि पात्रता धारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

तसेच संगणक शिक्षक पदाच्या 01 जागा असून सदर पदाकरीता उमेदवार हा B.CS . M.CS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर कला शिक्षक या पदांच्या 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा ATD , C.TD अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर खेळशिक्षक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमदेवार हा BA, BCOM ,B.PED अर्हताधारक असणे आवश्यक आहे .

सुरक्षा रक्षक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर शिपाई पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इ.10 वी  / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . वाहनचालक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज कुसुमाग्रज प्राथमिक व डॉल्फिन पुर्व प्राथमिक विद्यामंदीर जत्रा हॉटेलसमोर , आडगाव रोड पंचवडी नाशिक 422003 या पत्त्यावर दि.28.04.2023 पर्यंत सर्व कागतपत्रांसह अर्ज सादर करायचे आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment