दहावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना विविध पदांसाठी सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

Spread the love

केंद्र सरकारच्या अधिनस्त भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये फक्त दहावी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ASC Centre Recruitment for LDC ,Tradesman mate, Driver , Barber , motor Driver , Clener , Fireman ,Painter , Carpenter etc. ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये ASC सेंटर साऊथ -2 ATC  करीता खालील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्वयंपाकी02
02.सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर19
03.कनिष्ठ लिपिक05
04.ट्रेड्समन मेट ( मजुर )109
05.बार्बर03

ASC सेंटर नॉर्थ -1 ATC  करीता खालील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.चौकीदार17
02.वाहनचालक37
03.सफाईगार05
04.व्हेईकल मेकॅनिक12
05.पेंटर03
06.कारपेंटर11
07.फायरमन01
08.फायर इंजिन चालक04

पात्रता – वरील सर्वच पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर ज्या पदांना संबंधित अर्हता आवश्यक आहे जसे वाहनचालक पदांकरीता वाहन चालविण्याचा परवाना , लिपिक पदांकरीता टायपिंग परीक्षा अशी अर्हता असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : मुंबई महानगरपालिका मध्ये आत्ताची नवीन महाभर्ती 2023 !

वयोमर्यादा – सदर पदभरती करीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दि.05 मे 2023 पर्यंत किमान वय 18 वर्षे तर कमाल वयामर्यादा 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे , तर मागास प्रवर्ग ( ST / SC ) उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग ( OBC )  उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात यईल .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी ASC सेंटर साऊथ -2 ATC  करीता he Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07 या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत तर , ASC सेंटर नॉर्थ -1 ATC  करीता he Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07 या address वर अर्ज सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment