BMC : मुंबई महानगर पालिकेमध्ये आत्ताची नवीन पदभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदनाम , पदांची संख्या याबाबत सविस्तर भरती तपशील पुढील प्रमाणे पाहूयात ..

यामध्ये कनिष्ठ ग्रंथपाल संवर्गातील दोन रिक्त पदे सरळ सेवेने पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत , कंत्राटी पद्धतीने पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,पात्रता धारक उमेदवाराकडून ऑफलाईन कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : जिल्हा परिषद बुलढाणा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

आवश्यक शैक्षणिक पात्रता : बी.ए / बी.कॉम / बी.एस सी / एम .एल .आय .एम.सी 55% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .यामध्ये मान्यता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ ग्रंथपाल पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

वयोमर्यादा : सदर पदांकरिता उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षापेक्षा अधिक नसावे . यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 43 वर्ष पेक्षा अधिक असू नये .

हे पण वाचा : जिल्हा परिषद मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागामध्ये आपले अर्ज सादर करायचे आहे . सदर अर्ज ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने किंवा समक्ष येऊन सादर करायचे आहे ,अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 अशी असणार आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता 345/- रुपये आवेदन शुल्क आकारले जाणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment