जिल्हा परिषद बुलढाणा येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे .या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशील पुढील प्रमाणे पाहूया ..
यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 जागा , एमपीडब्ल्यू ( पुरुष ) पदांच्या एकूण 32 जागा , तर स्टाफ नर्स पदांच्या एकूण 32 जागा अशा एकूण 96 जागी करिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
हे पण वाचा : जिल्हा व सत्र न्यायालय मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय अधिकारी पदांकरिता उमेदवार हा एमबीबीएस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर एमपीडब्ल्यू (पुरुष ) या पदाकरिता उमेदवार विज्ञान विषयात बारावी पास त्याचबरोबर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आवश्यक , तर स्टाफ नर्स पदाकरिता उमेदवार हा जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा : सदर पदांकरिता अर्ज सादर करण्याकरिता उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे , यामध्ये मागासवर्गीय / राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना वयामध्ये पाच वर्षांची सूट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा या पत्त्यावर दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल ,अशा पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता , उमेदवारांकडून 150/- रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराकडून 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..