महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 64 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 64 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रादेशिक अधिकारी | 02 |
| 02. | वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 01 |
| 03. | वैज्ञानिक अधिकारी | 02 |
| 04. | कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | 04 |
| 05. | प्रमुख लेखापाल | 03 |
| 06. | विधी सहाय्यक | 03 |
| 07. | कनिष्ठ लघुलेखक | 14 |
| 08. | कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | 16 |
| 09. | वरिष्ठ लिपिक | 10 |
| 10. | प्रयोगशाळा सहाय्यक | 03 |
| 11. | कनिष्ठ लिपिक / टंकलेखक | 06 |
| एकुण पदांची संख्या | 64 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदवी / विज्ञान शाखेतील पदवी / विधी पदवी / इंग्रजी / मराठी शॉर्टहैंड / बी.एस्सी / टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : यामध्ये उमेदवाराचे दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता खुला प्रवर्ग 1000/- तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- परीक्षा शुल्क तर दिव्यांग / माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .