शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये गट – ड ( वर्ग – 4 ) पदांच्या 680 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर येथे गड ड ( वर्ग – ४ ) पदांच्या 680 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government Medical College And Hospital , Nagpur Recruitment For Class D Post Number of Post Vacancy – 680 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number Of Post ) : गट – ड ( संवर्ग 4 ) पदांच्या 680 जागांसाठी  मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Class – D Post , Number of Post Vacancy – 680 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 30.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gmcnagpur.org/vacancy या संकेतस्थळावर दिनांक 30 डिसेंबर 2023 पासून ते 20 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

जाहिरात पाहा

Leave a Comment