राज्य शासन सेवेमध्ये शासकीय व खाजगी शाळांमध्ये शिक्षक पदांच्या तब्बल 32 हजार जागेवर पदभरती करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आलेला आहे .यामध्ये राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.श्री.दिपक केसरकर यांनी माहिती देताना सांगितले कि , राज्यातील रिक्त शिक्षकांची पदे भरल्याशिवाय शैक्षणिक प्रगती होणे अशक्यच आहे .
राज्यातील खाजगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये आत्तापर्यंत तब्बल 10 वर्षांपासून शिक्षक पदभरतीच झालेली नसल्याने , सुमारे 67,000 शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे शिक्षण विभागांकडून माहिती समोर आलेली आहे .आता यापुढे राज्यातील खाजगी व अनुदानित शाळांमधील शिक्षकांची पदे ही राज्य शासनांकडूनच भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी दिलेली आहे .
यामुळे खासगी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी चालणारी वशिलेबाजी पुर्णपणे बंद होणार आहे .शिवाय उमेदवारांस आता टेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .यामुळे बऱ्याच दिवसांपासून रखडलेली पदभरती प्रक्रियेला अखेर वेग मिळणार आहे .
सदरची शिक्षकांची पदभरती प्रक्रिया ही माहे एप्रिल – मे महिन्यांच्या तब्बल 32 हजार शिक्षकांच्या पदांवर पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील बऱ्याच दिवसांपासून शिक्षक होण्यापासून वंचित असणाऱ्या उमेदवारांना अखेर हक्काची नोकरी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे .
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026