ठाणे महानगरपालिकेमध्ये मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

ठाणे महानगरपालिकेमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे . पदभरती संदर्भात आवश्यक पात्रता ,अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया ..

ठाणे महानगरपालिकेमध्ये परिचर पदाच्या एकूण 24 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

त्याचबरोबर उमेदवारास अनुभव असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवार हा एम एस सी आय टी किंवा CCC संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांकरिता व यामध्ये पाच वर्षाची सूट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन , सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी ठाणे या पत्त्यावर दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे . सदर भरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत माहितीसाठी www.thanecity.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment