महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये गट ड संवर्गातील तब्बल 4,010 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Government Group – D Recruitmet , Number of Post Vacancy – 4,010 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या बाबत सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : शिपाई , कक्षसेवक , बाह्यरुग्ण सेवक , अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर , रक्तपेढी परिचर , दंत सहाय्यक , मदतनिस या पदांच्या तब्बल 3,269 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तसेच नियमित क्षेत्र कर्मचारी ( इतर ) पदांच्या 183 जागा , नियमित क्षेत्र कर्मचारी ( हंगामी ) पदांच्या 461 जागा , अकुशल कारागीर ( परिवहन ) पदांच्या 80 जागा , अकुशल कारागीर ( HEMR ) पदांच्या 17 जागा अशा एकुण 4,010 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : अधिकारी , चालक , लिपिक , चौकीदार , सफाईवाला इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता – वरील पदांपैकी नियमित क्षेत्र कर्मचारी ( हंगामी ) या पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण तसेच फवारणी , डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून 80 दिवस काम केले असणे आवश्यक असणार आहे .तसेच अकुशल कारागीर या पदाकरीता उमेदवार हा 10 वी पात्रतेसह आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदवार हे शालांतर प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
जिल्हानिहाय पदांची संख्या पुढीलप्रामणे पाहु शकता ..
वयोमर्यादा – सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 18.09.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये मागास / अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी / सविस्तर जाहीरात पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !