अधिकारी , चालक , लिपिक , चौकीदार , सफाईवाला इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना अंतर्गत राज्यात अधिकारी , चालक , लिपिक , चौकीदार , सफाईवाला अशा विवधि पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तरी पदांनुसार आवश्यक शैक्षणिक व इतर व्यवसायिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex- Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 21 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल हे पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये OIC पॉलिक्लिनिक पदांच्या 01 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 01 जागा , दंत अधिकारी पदांच्या 02 जागा , लॅब तंत्रज्ञ पदांच्या 01 जागा , फार्मासिस्ट पदांच्या 01 जागा , चालक पदांच्या 02 जागा , चौकीदार पदांच्या 02 जागा , महिला परिचर पदांच्या 03 जागा , सफाईवाला पदांच्या 03 जागा , लिपिक पदांच्या 03 जागा , रेडिओग्राफर पदांच्या 01 जागा , दंत तंत्रज्ञ पदांच्या 01 जागा अशा एकुण 21 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक पात्रता – यांमध्ये पॉलिक्लिनिक व लिपिक पदांकरीता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर वैद्यकिय अधिकारी पदाकरीता एमबीबीएस तर दंत अधिकारी पदांकरीता बीडीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर लॅब तंत्रज्ञ पदाकरीता मेडिकल लॅब डिप्लोमा , तर फार्मसी पदाकरीता बी फार्मसी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांचे तब्बल 802 पदांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

तर चालक व चौकीदार पदाकरीता 08 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर महिला परिचर व सफाईवाला पदाकरीता उमेदवार हे साक्षर असणे आवश्यक असणार आहेत .तर रेडिओग्राफर पदांकरीता उमेदवार हे रेडिओग्राफर डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर , दंत तंत्रज्ञ पदाकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC Station Head Qurter CAD पुलगाव , तेह – देवळी जिल्हा – वर्धा , पिन 442303 या पत्यावर दिनांक 21 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर भरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment