महाराष्ट्र राज्याच्या शासकीय वैद्यकीय / आयुर्वेद / होमिओपॅथी महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयातील गट क व ड संवर्गातील एकुण 5,056 जागांसाठी पदभरती प्रक्रियेस राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे . या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांकडुन दि.20 जानेवारी 2023 रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .याबाबत सविस्तर पदभरती शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाच्या दि.11.01.2023 रोजीच्या प्रस्तावास नमुद संचालनालयाच्या अधिपत्याखालील 27 शासकीय वैद्यकीय / आयुर्वेद / होमोओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयातील कुशल , अकुशल व अर्धकुशल अशी एकुण 5,056 काल्पनिक पदे बाह्यस्त्रोतामार्फत भरण्यासाठी निविदा प्रारुपातील अटी व शर्तीनुसार निविदा प्रक्रिया राबविण्यास व त्याकरीता येणाऱ्या अंदाजे वार्षिक रुपये 109.52 कोटी एवढ्या खर्चास राज्य शासनाकडुन मान्यता देण्यात येत आहे .
यामध्ये शिपाई , दप्तरी , हमाल , सफाईगार , लखुलेखक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , आरोग्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , वाहन चालक , हमाल , ग्रंथालय सहाय्यक , कलाकार , कोडिंग क्लार्क , सुतार , हमाल ,छायाचित्रकार , धोबी , प्लंबर , क्ष – किरण तंत्रज्ञ , सुरक्षारक्षक , जमादार , कक्षसेवक इत्यादी पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
सदरची पदे हि बाह्य स्त्रोतामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असून , सदर पदांवर पदभरती करण्याबाबत सदर शासन निर्णयांमध्ये विविध अटी व शर्ती नमुद करण्यात आलेली आहेत . त्याचबरोबर सदर पदांवरील नियुक्त उमेदवारांना वेतनासाठी आवश्यक निधींच्या तरतुदीस प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे .
या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडुन पदभरती बाबतचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !