LIC : भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये तब्बल 9,400 जागांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !

Spread the love

भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये तब्बल 9,400 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .भारतीय आयुर्विमा ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असून , केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे . सदर महामंडळमध्ये रिक्त जागांवर मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी , एकुण पदांची संख्या

भारतीय आयुर्विमा महामंडळ कडुन विभागनिहाय रिक्त पदांची संख्या जाहीर करण्यात आलेली असून ,झोनल निहाय उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे . भारतामधील सर्व झोनलच्या रिक्त जागेवर पदभरती राबविण्यात येत आहे .यामध्ये महाराष्ट्र झोनलचा विचार केला असता , महाराष्ट्र ( वेस्टर्न झोनल ऑफीस ) विभागांमध्ये तब्बल 1942 जागा रिक्त आहेत .

पात्रता – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील ( Any fild Graduate ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .किंवा भारतीय विमा संस्थान , मंबई यांची फेलोशिप पात्रता असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .यामध्ये मागास वर्गीय ( SC / ST ) उमेदवारांना वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास वर्गीय ( OBC ) उमेदवारांकरीता वयांमध्ये 3 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – खाली  दिलेल्या लिंकवर आवश्यक शैक्षणिक पात्रतधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर भरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून आवेदन शुल्क म्हणून 750/- तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 100/- रुपये स्विकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment