कोतवाल पदांच्या 5,318 जागांसाठी मेगाभरती ! कोतवाल पदांसाठी आवश्यक पात्रता , मानधन , कामाचे स्वरुप !

Spread the love

प्राचीन काळांमध्ये कोतवाल हे पदे तालुक्यातील सर्वोच्च पद मानले जात होते ,प्राचिन काळांमध्ये कोतवाल हे तालुक्यातील सर्व शेतमाल गोळा करत असत .परंतु आता कोतवाल हे पद महसूल विभागातील सर्वात कनिष्ठ पद आहे .कोतवाल हे तलाठीला कामकाजांमध्ये मदत करण्याचे काम करत असतो . या पदांवर पदभरती करण्यासाठी राज्य शासनांकडून पदभरती शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

कोतवाल पदांसाठी आवश्यक पात्रता – कोतवाल पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्कय आहे त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे , याकरीता उमदेवारांस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे .

मानधन – कोतवाल हे पद शासकीय पद नसून राज्य शासनांचे अतिरिक्त कर्मचारी आहेत . सदर पदांकरीता वेतन न देता प्रतिमहा मानधन अदा करण्यात येते . हे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार भिन्न असते . यापुर्वी 5000/- ते 7,500/- रुपये प्रतिमहा मानधन अदा करण्यात येत होते , परतु आता सुधारित शासन निर्णयानुसार प्रति महा 7500 ते 12,500/- रुपये प्रतिमहा मानधन देण्यात येते .

हे पण वाचा : ICICI बँकेत 13,730 पदांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !

कामाचे स्वरुप – कोतवाल हे पद महसुल विभागाचे स्तरानुसार सर्वात कनिष्ठ पातळीचे पद असल्याने तलाठी तसेच ग्रामसेवक व पोलिस पाटील यांनी सांगितलेले कार्यालयाचे सर्व कामे करावे लागतात . त्याचबरोबर ग्रामपंचायत पातळीवरचे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे , तलाठी ,ग्रामसेवक , पोलिस पाटील यांनी वेळोवेळी सांगतले काम करण्याची जबाबत कोतवाल वर असते .

कोतवाल पदभरती संदर्भात निर्गमित करण्यात आलेली सुधारित पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment