महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागांमध्ये कोतवाल पदांच्या तब्बल 5,318 रिक्त पदांसाठी महाभरती जाहीरात !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या महसुल विभागाच्या अखत्यारित असलेला कोतवाल संवर्ग हा अवर्गीकृत मानधन तत्वावरील पद असून शासकीय कर्मचारी नाही . कोतवाल संवर्गाकरीता दि.07 मे 1959 च्या शासन निर्णयान्वये स्वतंत्र सेवाप्रवेश नियम विहीत करण्यात आलेले आहेत . तसेच कोतवाल संवर्गाची पदे भरताना राज्यात सर्व ठिकाणी समानता येण्यासाठी महसुल व वन विभागाच्या दिनांक 05 सप्टेंबर 2013 च्या शासन निर्णयान्वये सुधारित नियम व मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .

त्याचबरोबर आता शासनाने सुधारित नियम व सेवा निवड मंडळाच्य कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे भरतांना मौखिक परीक्षा / मुलाखत न घेण्याबाबतचे धोरण ठरविले आहे . तसेच शासनाने सरळसेवा भरतीसाठी नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना वेळोवेळी सुधारित केलेल्या बिंदुनामावलीची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

राज्य शासनाच्या सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वांमधील तरतुदीनुसार कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे . लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत .त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे .

नामनिर्देशनाद्वारे पदभरती करताना बिंदुनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

कोतवाल पदभरती प्रक्रिया बाबत निर्गमित सविस्तर पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

जाहिरात पाहा

Leave a Comment