शिपाई पदभरती : शिपाई पदांच्या रिक्‍त जागेपैकी 16,370 जागेवर मेगाभरती प्रक्रिया 2022

Spread the love

राज्य शासन सेवेत शिपाई पदभरती प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली होती . यामुळे राज्य शासन सेवत शिपाई पदांचे भरपुर पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांमुळे प्रशासनावर कामाचा मोठा ताण निर्माण होताना दिसत आहे .सध्या राज्य शासन सेवेत ज्या ठिकाणी अधिक जबाबदारीचे कामकाम नाही अशा ठिकाणी कायमस्वरुपी पद्धतीने शिपाई हे पद न भरता मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला आहे .

रिक्त जागांपैकी शिपाई पदांच्या एकुण 16,370 जागेसाठी मेगाभर्ती –

सध्या राज्य शासन सेवेत शिपाई पदांच्या मंजुर पदांपैकी वर्ग – 4 मधील पदे हे मृत ( Lapse ) घोषित करण्यात आलेले आहेत . त्याऐवजी बहुउद्देशिय कर्मचारी नावाने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . बहुउद्देशिय कर्मचाऱ्यांना वर्ग – 4 संवर्गातील सर्वच कामे करावी लागणार आहेत .सदरचे पदे हि अधिक जबाबदारीच्या ठिकाणी कायमस्वरुपी पद्धतीने जसे कि , पाणीपुरवठा विभाग , गृह विभाग , पोलिस यंत्रणा कामकाज , मंत्रालय कामकाज , राज्यपाल निवास / सचिवालय अशा अधिक जबाबदारीच्या ठिकाणी शिपाई / बहुउद्देशिय कर्मचारी हे पद कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहे .

कायम /ठोक मानधन तत्वावर पदभरती –

ज्या ठिकाणी अधिक जबाबदारी नाही अशा ठिकाणी शिपाई / बहुउद्देशिय कर्मचारी हे पद ठोक मानधन / कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .सध्या मंजुर पदांपैकी 16,370 पदे कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहेत . सदरची पदभरती ही विभागनिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असून , सदर पदभरती ही IBPPS / ITC कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहेत .

गृह विभागातील पोलिस शिपाई हे पद वर्ग – 3 मध्ये मोडत असल्याने सदरचे पदे हे सदर पदभरती प्रक्रियामध्ये मोडत नाहीत . गह विभागा अंतर्गत होम गार्ड हे पद अतिरिक्त कर्मचारी असतात , तर गृह कार्यालयांमध्ये वर्ग – 4 कर्मचारी म्हणून कार्यालय परिचर , सहाय्यक हे पद कार्यरत पदे असतात .


Leave a Comment