महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसेवक पदांच्या 17,820 जागेसाठी लवकरच मेगाभरती राबविण्यात येणार आहे .पशुसेवक पद महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त कर्मचारी असून , या कर्मचाऱ्यांना मानधन स्वरुपामध्ये वेतन दिले जाते . पशुसेवक हे पद प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पद मंजुर असते . यानुसार राज्यामध्ये काही ग्रामपंयातीमध्ये हे पद भरलेले आहेत . हे पद सध्या पशुसंवर्धन महामंडळ मार्फत भरले जाते . या पदासाठी सविस्तर आवश्यक पात्रता , पदांची संख्या याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये , एकुण 28,003 ग्रामपंचायती असून , यापैकी काही ग्रामपंचायती मध्ये , पशुसेवक हे पद कायमस्वरुपी पद्धतीने भरले आहेत . तर काही ग्रामपंचायतीमध्ये पशुसंवर्धन महामंडळामार्फत भरले आहेत . मागील 7 वर्षांपासुन या पदांकरीता कोणतीही भरती प्रक्रिया राबिविली गेली नाही .अनेक ग्रामपंचायतीमध्ये , पशुसेवक हे पदच नामंजुर झाले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या पशुसंवर्धानासाठी मोठी अडचण निर्माण होत आहेत . जसे कि , सध्या जनांवरावर लम्पी आजाराची मोठी साध आल्याने अनेक पशुंचा मृत्यु होत आहे . यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पशुसेवक हे पद असणे आवश्यकच असल्याने , प्रत्येक ग्रामपंचायतीला एक पशुसेवक पद भरण्यात येणार आहे .
पशुसेवक पदासाठी पात्रता –
पशुसेवक पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता 8 वी पास आहे . त्याचबरोबर उमेदवार शारिरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा स्थानिक असल्यास त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल .त्याचबरोबर उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 45 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
वेतनमान – पशुसेवक पदासाठी ठोक मानधन दिले जाते , दरमहा 8000 रुपये ते 15,000/- रुपये ठोक मानधन दिले जाते . त्याचबरोबर कामाची व्याप्ती जास्त असल्यास , अशा पशुसेवकास अतिरिक्त भत्ते दिले जाते .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !