महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक व वर्ग – ड संवर्गातील 3203 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदभरती प्रक्रिया बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन बल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाद्वारे पदभरती प्रक्रियाबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत .यामध्ये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ) गट ब ( अराजपत्रित ) , गट क व गट – ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत .
सध्या वनविभागामध्ये वनरक्षक , वन कामगार ( वर्ग – ड ) तसेच कनिष्ठ लिपिकांची सुमारे 3203 पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर 100 टक्के क्षमतेने पदभरती करणेबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे .यापैकी वनरक्षक पदांचे 2000 पदे भरण्यात येणार आहेत . त्याचबरोबर काही पदे वाढीव मंजुर करण्यात येणार आहेत . यामुळे अधिसंख्य पदे निर्माण होतील .यामध्ये पुर्वी पेसा क्षेत्रात वनरक्षकांची 100 टक्के पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीकरीता राखीव होती . मा.राज्यपाल यांचेकडील अधिसूचना दि.29.08.2019 अन्वये पेसा क्षेत्रातील पदे अनूसचित जमातींच्या लोकसंख्येनुसार 100 टक्के / 50 टक्के व 25 टक्के याप्रमाणे राखीव करण्यात आलेली आहेत .
वन विभागांकडुन पदभरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत .यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची शेवटची दि.31.12.2022 असणार आहे . तर शारिरीक चाचणी प्रक्रिया 10.02.2023 ते 20.02.2023 या कालावधीमध्ये घेण्यात येईल .तर निवड झालेल्या उमेदवारांना दि.05.03.2023 पर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येतील .या संदर्भाती पदभरती प्रक्रियाचे वेळापत्रक जाहीरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !