राज्यातील सर्व सरकारी , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रतिक्षा संपणार आहे .राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . महागाई भत्ता वाढीबाबतची आत्ताची अपडेट पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात .
केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 % DA वाढ लाभ –
मिडीया रिपोर्टनुसार , केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासन सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के वाढीव महागाई भत्ता माहे जुलै 2022 पासून लागु करणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वित्त विभागाडुन तयार करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी डी.ए वाढीबाबतची प्रतीक्षा अखेर संपणार आहे .
जुलै पासूनची DA थकबाकी –
राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून वाढीव 4 टक्के डी.ए लागु करुन जुलै पासूनची डी.ए थकबाकी देखिल अदा करण्यात येणार आहेत .4 टक्के DA वाढ ही माहे डिसेंबर 2022 पासून लागू होण्याच्या शक्यता असल्याने जुलै ते नोव्हेंबर या कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
कर्मचारी विषयक , शासकीय योजना / भरती व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .
- फिजिक्स वाला महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- समर्थ पॉलिटेक्निक नगर अंतर्गत HOD , लेक्चरर , वर्कशॉप अधिक्षक , अकाउंटंट , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- वन विभाग अंतर्गत शिपाई ( MTS ) , लिपिक ,सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन , पुणे अंतर्गत केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती ; Apply Now !
- आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !