राज्यातील विविध वर्गातील वीज ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य करणेबाबत उद्योग उर्जा व कामगार विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.25.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . वीजबिलामध्ये सवलत देणेबाबतचा उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला विज दरात सवलत देण्यात आलेली आहे . सदर वीज बीलाची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडुन करण्यात करण्यात येत असते .महावितरण कंपनीला कृषीपंप ग्राहकांना वीज सवलतीसाठी सन 2022 – 23 करीता अर्थसंकल्पित 4940 कोटी रकमेपैकी 3723 कोटी रक्कम समायोजनाने महावितरण कंपनीला वितरीत करण्यात आली आहे .त्याचबरोबर औद्यागिक ग्राहकांना वीज दरांमध्ये सवलत देण्यात आलेली होती , त्या बिलाची प्रतिपुर्ती करण्यासाठी 1200 कोटी रक्कमेपैकी राज्य विद्यूत वितरण कंपनीस समायोजित रक्कम अदा करण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर ज्या घरगुती ग्राहकांचे विज जोडणी थकबाकीमुळे स्थगित करण्यात आलेली होती . अशा घरगुती ग्राहकांना पुन्हा नव्याने वीज जोडणीसाठीसाठी वीज सवलत योजना राज्य शासनाकडुन राबविण्यात आलेली होती .याकरीता देखिल वीज देयक रक्कम मंजुर करण्यात आलेली आहे .या निर्णयामुळे राज्य महाविरण कंपनीचे थकित वीज समायोजनाने भरणा करण्यात आलेला आहे .
त्याचबरोबर राज्य शासनाच्या विविध धोरणानुसार ज्या ग्राहकांनी विज बिलांमध्ये सवलत प्राप्त केलेली नाही . अशा ग्राहकांसाठी विज देयक अदा करण्यासाठी आगाऊ निधी मंजुर करण्यात येणार आहे .राज्य शासनाच्या या धोरणांनुसार लाभ घेण्याकरीता माहे डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे .विज बिलांमध्य सवलत देणेबाबतचा उद्योग , उर्जा व कामगार विभागाचा दि.25.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करणसाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .