राज्य सरकारमध्ये , तलाठी ग्रामसेवक ,कृषीसेवक त्याचबरोबर शिपाई पदांसाठी मोठी मेगाभरती राबविण्यात येणार आहेत . बऱ्याच दिवसांपासुन राज्य सरकारमध्ये , तलाठी , ग्रामसेवक व कृषीसेवक व शिपाई पदांसाठी भरती झालेली नसल्याने , रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . शिवाय गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायतीच्या संख्येमध्ये देखिल वाढ झाल्याने कर्मचारी वर्ग कमी पडत आहे . यामुळे सदर रिक्त पदांवर महाभरती होणार आहे .
राज्य शासन सेवेतील तलाठी हे ग्रामिण पातळीवरील महसुल प्रमुख असुन या पदांचे महत्व खुप मोठे आहे . दोन – तीन ग्रामपंचायत मिळून तलाठी सज्जांसाठी एक तलाठी पद कार्यरत असतो . ग्रामपंचायत मोठी असल्यास , एक तलाठी पद मंजुर असते . सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये तलाठी पदांच्या 1012 जागेंवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणाार आहे .त्याचबरोबर लोकसंख्या वाढीनुसार काही पदे वाढविण्यात येणार आहेत .त्याचबरोबर राज्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक अशी दोन पदे आहेत .हे दोन्ही पदे रद्द करुन नवे पद निर्माण करण्यात येणार आहे . याबाबत राज्य शासनाकडुन अभ्यास समिती देखिल स्थापन करण्यात आलेली आहे .या ग्रामसेवक पदांच्या सुमारे 5000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत . यापैकी 50 टक्के पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे .
त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर कार्यरत कृषीसवेक हे पद खुप महत्वाचे आहे कृषीसेवक शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यास मदत करतो .या पदांचे सुमारे 1830 जागा रिक्त आहेत .या पदांसाठी कृषी पदवी / पदविका पात्रता आवश्यक असते . या पदावर देखिल लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .त्याचबरोबर जिल्हा परिषद व महसुल विभागातील शिपाई पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने , कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे .
वरील पदांसाठी महाभरती डिसेंबर महिन्यापासुन प्रत्यक्ष राबविण्यात येईल .यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे .
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !