राज्य सरकारमध्ये , तलाठी ग्रामसेवक ,कृषीसेवक त्याचबरोबर शिपाई पदांसाठी मोठी मेगाभरती राबविण्यात येणार आहेत . बऱ्याच दिवसांपासुन राज्य सरकारमध्ये , तलाठी , ग्रामसेवक व कृषीसेवक व शिपाई पदांसाठी भरती झालेली नसल्याने , रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . शिवाय गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायतीच्या संख्येमध्ये देखिल वाढ झाल्याने कर्मचारी वर्ग कमी पडत आहे . यामुळे सदर रिक्त पदांवर महाभरती होणार आहे .
राज्य शासन सेवेतील तलाठी हे ग्रामिण पातळीवरील महसुल प्रमुख असुन या पदांचे महत्व खुप मोठे आहे . दोन – तीन ग्रामपंचायत मिळून तलाठी सज्जांसाठी एक तलाठी पद कार्यरत असतो . ग्रामपंचायत मोठी असल्यास , एक तलाठी पद मंजुर असते . सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये तलाठी पदांच्या 1012 जागेंवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणाार आहे .त्याचबरोबर लोकसंख्या वाढीनुसार काही पदे वाढविण्यात येणार आहेत .त्याचबरोबर राज्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक अशी दोन पदे आहेत .हे दोन्ही पदे रद्द करुन नवे पद निर्माण करण्यात येणार आहे . याबाबत राज्य शासनाकडुन अभ्यास समिती देखिल स्थापन करण्यात आलेली आहे .या ग्रामसेवक पदांच्या सुमारे 5000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत . यापैकी 50 टक्के पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहे .
त्याचबरोबर ग्रामीण पातळीवर कार्यरत कृषीसवेक हे पद खुप महत्वाचे आहे कृषीसेवक शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यास मदत करतो .या पदांचे सुमारे 1830 जागा रिक्त आहेत .या पदांसाठी कृषी पदवी / पदविका पात्रता आवश्यक असते . या पदावर देखिल लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .त्याचबरोबर जिल्हा परिषद व महसुल विभागातील शिपाई पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने , कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण निर्माण होत आहे .
वरील पदांसाठी महाभरती डिसेंबर महिन्यापासुन प्रत्यक्ष राबविण्यात येईल .यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र राज्य शासन सेवेत नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे .
- OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 996 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !