नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . राज्य शासन सेवेत मागील दोन वर्षांपासुन कोरोना महामारीमुळे नोकर भरतीवर निर्बंध लावण्यात आले होते . सध्या कोरोना रोगाचे 100 टक्के निर्मुलन झाल्याने , नोकर भरती प्रक्रियेवरील निर्बंध राज्य शासनाकडुन उठविण्यात आले आहे . या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.30.09.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
ज्या प्रशासकीय विभागामध्ये वित्त विभागाच्या दि.11.02.2016 च्या निर्देशाप्रमाणे सुधारित आकृत्तीबंध अंतिम मंजुर केले आहेत ,त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृत्तीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेमधील सरळसेवेच्या कोट्यामधील रिक्त असलेली पदे 100 टक्के भरण्यास सदर निर्णयानुसार मुफा देण्यात येत आहे .त्याचबरोबर ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि.11.02.2016 च्या निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC ) कक्षेतील पदे वगळता , अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे .या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर किमान एक पद भरता येणार आहे .
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आर्थिक उपाययोजना अंतर्गत दि.04.05.2020 चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावाीत , राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव , वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे 100 टक्के भरण्यास या शासन निर्णयान्वये मुभा देण्यात येत आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.30.09.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक -202210031103191705 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .